वाळूचा टॅक्टर पोलीसांना पकडून देतो काय.. म्हणत बेदम मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : वाळूचा ट्रॅक्टर पोलीसांना पकडून देतो काय..? असे म्हणत घरातील एक तरुणास दुसऱ्या तरुणाने बेदम मारहाण करून घराचा पत्रा उचकटून नुकसान केले आहे.
हा प्रकार २४ सप्टेंबरला दुपारी पावणेतीन वाजता आवाटी येथे घडला आहे. या प्रकरणी तानसेन जनार्दन खांडेकर (वय – २५, रा. आवाटी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २४ सप्टेंबरला दुपारी पावणेतीन वाजता मी माझ्या घरात बसलो असताना आझम सलीमखान शेख हा घरात आला व तु माझा मामा ताहेर जाफर खान यांचा वाळूचा ट्रॅक्टर पोलीसांना का पकडून दिला.. असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. तसेच घराचे पत्रे उचकटून नुकसान केले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे करत आहेत.


