केडगाव येथे वृक्षाची रोपे वाटप करून वाढदिवस साजरा
करमाळा (संदेश प्रतिनिधी)- केडगाव (ता.करमाळा) येथील वैभव चंद्रकांत बोराडे यांनी आपला ३७ वा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला. दिनांक २८ मे रोजी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून ५१ आंब्यांच्या रोपांचे वाटप मित्रपरिवार व ग्रामस्थांमध्ये केले.
रोप वाटप करताना त्यांनी अशी विनंती केली की, फक्त झाडे लावायचीच नाहीत तर लावलेली झाडे जगवायची व दर ३ महिन्यानंतरचा झाडासोबतचा सेल्फी काढून ग्रूप वर पाठवा. यावेळी भविष्यामध्ये मित्रपरिवाराच्या माध्यमातून वृक्षलागवड मोहिम राबवण्याचा मनोदय वैभव यांनी व्यक्त केला. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व मित्रपरिवार यांच्याकडून कौतुक होत आहे.