सालसे येथे बूथ अवेअरनेस ग्रुपची मीटिंग संपन्न -

सालसे येथे बूथ अवेअरनेस ग्रुपची मीटिंग संपन्न

0


करमाळा (दि.२५) – सालसे येथे २४४ करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकी २०२४ च्या अनुषंगाने बूथ अवेअरनेस ग्रुपची (BAG) मीटिंग संपन्न झाली. यावेळी करमाळा तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा बूथ लेवल मॅनेजमेंट प्लॅनचे नोडल अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

मतदान जागृती व मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे तसेच बूथ लेवलवर आवश्यक असलेल्या सेवा सुविधा,अडीअडचणी याविषयी आढावा घेतला. बुथ अवरनेस ग्रुपच्या माध्यमातून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने हा ग्रुप सक्रिय राहील, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शंभर टक्के सहभागी होईल त्याचप्रमाणे या ग्रुपच्या माध्यमातून मतदान केंद्रावरील सोयी सुविधांची देखील खातरजमा केली जाईल. एकंदरीत बूथ अवेअरनेस ग्रुप हा या मतदान प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा ग्रुप आहे. त्या दृष्टीने तो सतत सक्रिय व कार्यशील राहील अशी अपेक्षा श्री सूर्यवंशी यांनी व्यक्त केली . संपूर्ण करमाळा विधानसभा मतदारसंघात सदर ग्रुपच्या माध्यमातून मतदान जाणीव जागृती व्हावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी बूथ लेवल अधिकारी अनिल कब्जेकर, अजित कणसे, अशोक सालगुडे, सतीश ओहोळ, नागेश ओहोळ, विकास माळी, शुभम रुपनर, साजिद मुजावर, शितल कांबळे, सुरेखा हांडे, वैशाली गायकवाड, सविता लंगोटे आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!