भावाकडून भावास व भावजयीस कोयत्याने मारहाण - देवळाली येथील प्रकार.. - Saptahik Sandesh

भावाकडून भावास व भावजयीस कोयत्याने मारहाण – देवळाली येथील प्रकार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : किरकोळ कारणावरून भावाने भाऊ व भावजयीस कोयत्याने मारहाण करून जखमी केले आहे. हा प्रकार देवळाली येथे काल (ता. २२) सायंकाळी पाच वाजता घडला आहे. या प्रकरणी वंदना पप्पू पवार (रा. देवळाली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की काल (ता. २२) सायंकाळी सहा वाजता मी व माझे पती पप्पू पवार दोघे मिळून घरी असताना दीर समाधान पवार हा शिव्या देत आमच्या अंगावर धावून आला व तुझे घर येथे नाही, तु येथे रहायचे नाही. असे म्हणून माझ्या पतीच्या डोक्यात कोयत्याने मारहाण केली. मी सोडविण्यास गेले असता, एकनाथ पवार याने मला हाताने मारहाण केली तर मंगल पवार हिने शिवीगाळ करून धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!