दिवसा चोरी करणाऱ्या चोरास विहाळ येथील तरुणांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रंगेहाथ पकडले.. - Saptahik Sandesh

दिवसा चोरी करणाऱ्या चोरास विहाळ येथील तरुणांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रंगेहाथ पकडले..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : विहाळ (ता.करमाळा) येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून घरातील चोरी करताना चोरास पाहिल्यानंतर चोरास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतू चोर मोटारसायकलवर पळून गेला. त्यानंतर मोटारसायकलवरच पाठलाग करत सिनेस्टाईलने विहाळच्या तरूणांनी त्यास रंगेहाथ पकडले आहे. चोरास पकडले असलेतरी त्याच्या साथीदारांनी मात्र चोरीतील रोख रूपये पळवून नेले आहेत. या चोरास पोलीसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास २६ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

विहाळ येथे पोपट रामहरी मारकड यांच्या घराची वास्तुशांती २२ मे ला सकाळी अकरा वाजता असल्याने विकास आजिनाथ मारकड व त्यांचा परिवार या कार्यक्रमाला गेले होते. दरम्यान दुपारी बारा वाजता जनावरांना पाणी पाजण्यासाठी सूरज मारकड हा घरी आला असता त्यास घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर तो घरात गेला असता सामान अस्ताव्यस्त दिसले व फ्रिजच्या बाजूला एक अनोळखी इसम लपलेला दिसला. सूरजने त्यास पकडण्याचा प्रयत्न केले असता, तो निसटी मारून पळाला व मोटारसायकलवर निघून गेला. त्यानंतर ही बाब मुलाने सांगितल्यानंतर मी स्वत: तसेच अनिल परबत मारकड तसेच आण्णा काशिनाथ मारकड व पिंटू जालिंदर मारकड आम्ही मोटारसायकलवर त्याचा पाठलाग करत गेलो असता हा चोर राजुरी शिवारात मोटारसायकलवरून घसरून पडला. त्यानंतर आम्ही व राजुरी येथील नागरीकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. यातील संशयिताचे नाव.. संदीप रोहिदास धोत्रे ( वय १९, रा. कुडू, ता. माढा) असे असून त्यास पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २६ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!