करमाळा येथे कायदेशिषयक शिबीर संपन्न…

करमाळा (दि.१९): करमाळा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. मनोज एस. शर्मा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यु.पी.देवर्षी व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश संजय घुगे यांचे मार्गदर्शनानुसार कायदेशीर शिबीर (Mini Legal Camp) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हे कायदेविषयक शिबीर १८ मार्च रोजी ९.०० वाजता पंचायत समिती हॉल, करमाळा येथे संपन्न झाले. या कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चे न्यायाधीश संजय घुगे व सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर एस.पी.कुलकर्णी, गट विकास अधिकारीअमित कदम तसेच करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड आर.ए. बरडे, उपाध्यक्ष ॲड. एस. ए. रोकडे, ॲड. पी.व्ही. बागल, ॲड. अक्षय वीर, ॲड. ए. ए. पवार, ॲड. सविता शिंदे, ॲड.डी.एम. कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन वरिष्ठ लिपीक एस.एल. जाधव, यांनी केले. या कार्यक्रमास ॲड. पी.व्ही. बागल यांनी “आम्ल हल्ला”, ॲड. अक्षय वीर यांनी “बालविवाह प्रतिबंध कायदा” ॲड.सविता शिंदे यांनी “आंतरराष्ट्रीय महिला दिन” हे विषय समजावून सांगितले तर न्यायाधीश एस.पी. कुलकर्णी, यांनी “कौटूंबिक हिंसाचार कायदा”, या विषयावर मार्गदर्शन केले. तर श्री.सुर्यवंशी बाल प्रकल्प अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. व न्यायाधीश संजय घुगे यांनी अध्यक्षीय भाषणात आम्ल या शब्दाची फौजदारी कायदयानुसार व्याख्या, मनोधैर्य योजनेबाबत माहिती, बाल विवाह व त्यावरील उपाय योजना आणि महिला सबलीकरण या सर्व विषयांचा आढावा घेतला व सर्व उपस्थित श्रोत्यांना कायदयाविषयक मार्गदर्शन केले.
या शिबिराचे आभार प्रदर्शन करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमित कदम यांनी केले. सदर कार्यक्रमास करमाळा तालुक्यातील आशा वर्कस, अंगणवाडी सेवीका, महिला ग्रामसेवक असे एकुण ३०० महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.





