यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये ‘करिअर कट्टा’ फलकाचे अनावरण…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमाच्या फलकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
करियर कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना 365 रुपयांमध्ये 1000 दिवस आय.ए.एस. आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच विविध प्रकारचे 50 ॲन्ड ऑन कोर्स मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी समन्वयक डॉ. अंकुश करपे व प्रा. कृष्णा कांबळे यांच्याशी संपर्क साधावा. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.



