केमच्या ग्रामसभेत विविध पारितोषिके वितरण व दिव्यांगांना चेकचे वाटप करण्यात आले

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील सर्वात मोठया समजल्या जाणाऱ्या केम ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सारिका कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पत्रकार, खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला, दिव्यांगांना चेकचे वाटप करण्यात आले तर विविध प्रश्न देखील मांडण्यात आले.
या सभेचे प्रस्ताविक सदस्य गोरख पारखे यांनी केले. सुरूवातीला आदर्श पत्रकारिता पुरस्काराचे वितरण सरपंच सारिका कोरे उपसरपंच सागर कुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुरस्कार संदेश न्यूजचे व दै पुढारीचे प्रतिनिधी पत्रकार संजय जाधव, टीव्ही 9 चे पत्रकार शितलकुमार मोटे सोलापूर माझाचे पत्रकार हर्षद गाडे, पत्रकार प्रविण मखरे, राहुल रामदासी यांना देण्यात आले.
क्रिडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविलेले खेळाडू व आदर्श शिक्षक पुरस्कार राजाभाउ तळेकर प्रशालेचे मुख्याध्यापक मनोज तळेकर तसेच श्री उत्तरेश्वर हायस्कूल, नुतन माध्यमिक विद्यालय, राजाभाऊ तळेकर विद्यालय, प्राथमिक आश्रम शाळा, शा.गो पवार विद्यालय या विविध प्रशालेतील खेळाडूंचा सन्मान सरपंच सारिका कोरे, उपसरपंच सागर कुर्डे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अच्युत काका पाटिल यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
तसेच ग्रामपंचायत दिव्यांगासाठीच्या पाच टक्के निधीतून दिव्यांगाना प्रत्येकी चार हजार रूपयेच्या चेकचे वाटप सरपंच, उपसरपंच, प्रहार संघटनेचे अध्यक्ष संदिप तळेकर सामाजिक कार्यकर्ते राहुल आबा कोरे यांच्या हस्ते देण्यात आले. या मध्ये नितीन केंगार, सुंदरदास बिचितकर, बबन साखरे, आरती गुटाळ, सुमेरा मुलाणी साक्षी तळेकर, कुर्मदास कांबळे, नागनाथ कोळेकर गणेश पळसे चाॅंद पठाण माधव ननवरे याना देण्यात आले.

गावातील विविध प्रश्न मांडले
- या ग्रामसभेत विविध प्रश्न देखील मांडण्यात आले. शिवसेना महिला आघाडिच्या तालुका प्रमुख सौ वर्षा चव्हाण यांनी केम-दहिवली रस्तावरील खड्डा बुजविण्यात यावा तसेच आमच्या प्रभागील रस्तावरील विजेचे बल्ब बसवावे अशी मागणी केली.
- चेअरमन अरूण लोंढे यांनी स्मशानभुमीजवळील रस्ताच्या कडेला अपघात होण्यास कारणीभूत ठरू शकणारे अतिक्रमण काढून टाकावे अशी मागणी केली.
- युवा सेनेचे सागर तळेकर यांनी गावचे प्रवेशव्दार शिवसंभो वेशीला ग्रामपंचायतीच्या खर्चातून रंग रंगोटी करावी अशी मागणी केली. यावर ग्रामसेवक यांनी केम ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती मजबूत नसल्याचे सांगीतले.
- ग्रामसेवक यांनी यावेळी बोलताना ग्रामपंचायतीची नळपट्टी, घरपट्टीची दोन कोटी थकबाकी असून ग्रामपंचायतीच्या कामगारांना सहा महिने पगार झाले नसल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी घरपट्टी, नळपट्टी वेळीच भरून ग्रामपंचायतीच्या विकास कामात हातभार लावण्याचे आवाहन केले.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहोळ,योगेश ओहोळ, विष्णू अवघडे, गोरख पारखे सुलतान मुलाणी शरद वायभासे, प्रहारचे संदिप तळेकर, दत्तात्रय बिचितकर,गोसेवक परमेश्वर तळेकर, शिवसेना अध्यक्ष सतीश खानट, केंद्र प्रमुख महेश कांबळे, संजय नवले अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी केद्रीय मुखयाध्यापिका तसेच सहशिक्षक ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.





