अखेर केम ग्रामपंचायतीकडून केम-दहिवली मार्गावरील बुजविण्यात आला खड्डा

केम (संजय जाधव): केम येथील संभाजी चौकातून जाणाऱ्या केम-दहिवली रस्तावर मोठा खड्डा पडला होता. यामुळे यावरून ये-जा या करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हा खड्डा त्वरीत ग्रामपंचायतीने बुजवून घ्यावा अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता. याबाबत संदेश न्यूज मध्ये बातमी प्रसिध्द झाली होती. या बातमीची दखल केम ग्रामपंचायतीने घेत या रस्तावर पडलेला खड्डा जे.सी.बी. च्या साह्याने खडी टाकून बुजवून घेतला आहे.
हा खड्डा बुजवल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे. या बद्दल केम ग्रामपंचायतीचे नागरिकांनी आभार मानले.

संबंधित न्यूज : केम-दहिवली रस्त्यावरील खड्डा बुजविण्याची मागणी





