केम येथील शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अनोखी आदरांजली

केम(संजय जाधव): श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त केम येथे शंभू भक्तांकडून २० फेब्रुवारी ते २९ मार्च फाल्गुन शुध्द प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत धर्मवीर मास साजरा करून श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करून आदराजंली वाहिली.
छत्रपती श्री संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर पूर्ण महिनाभर शंभू भक्त जाणता राजा क्लबचे अध्यक्ष समीर तळेकर,ओंकार जाधव, दत्ता तळेकर यांनी कडक उन्हाळयात पायात चप्पल न घालने, मांसाहार वर्ज करणे, चहा न पिणे, कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी न होणे अशा गोष्टींचा त्याग केला.
राजे छत्रपती संभाजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून मंत्राचे पठन केले. या वेळी युवा नेते अजित दादा तळेकर बालाजी आवताडे, बबलू सुरवसे, गणेश आबा तळेकर संग्राम तळेकर विजय तळेकर, सूरज गोडगे,सोन्या तळेकर, आदित्य तळेकर, विशाल जाधव दत्ता तळेकर, नवा पाटमास रोहिदास खरवडे, सोन्या खरवडे, सागर परिट,शंभू तळेकर महेश तळेकर आदी शंभू भक्त उपस्थित होते.





