केम महसूल मंडळमध्ये पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात यावे – नागरिकांची मागणी

केम (संजय जाधव) – केम महसूल मंडळात पूर्वी पर्जन्य मापक यंत्र बसविले होते. त्यामुळे पावसाची नोंद वेळच्या वेळी केली जात होती परंतू मागील २ वर्षांपूर्वी केम येथे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती, या पावसात हे पर्जन्य मापक यंत्र वाहून गेले त्यानंतर नवीन पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले नाही. त्यामुळे पावसाची नोंद कशी घेणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

केम महसूल मंडळात एकूण दहा ते बारा गावे आहेत. या वर्षी पावसाने चांगली सुरूवात केली आहे त्यामुळे आता याची गरज आहे केम येथे आठ दिवस झाले सतत,धार पाऊस सुरू आहे त्यामुळे नेमका किती पाऊस झाला हे कळत नाहि केम येथे जोरदार पाउस झाला पण पर्जन्य माफक यंत्र नसल्याने याची नोंद कसी होणार अंदाजे तरी किती पाऊस पडला हे कसे ठरवणार यावर पिक पाण्याची नोंद ठरवली जाते या वर शासनाची मदत मिळते तरी या महसूल मंडळात त्वरित पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.


या बाबत गावकामगार तलाठी आदलिंगे यांच्या कडे विचारणा केली असता ते म्हणाले की, गेल्या वर्षीच पर्जन्य मापक यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे परंतु अजून यंत्र मिळाले नाही. त्याचा पाठपुरावा करणार आहोत.

