केम महसूल मंडलमधील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ८३ लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर - Saptahik Sandesh

केम महसूल मंडलमधील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ८३ लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : ऑक्टोबर २०२२ मध्ये केम महसूल मंडलमध्ये अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून ६ कोटी ८३ लाख रूपये मंजूर झाले आहेत. त्यामध्ये केम साठी साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे.

केम महसूल मंडलमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. तब्बल १३२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या मध्ये फळबागा,तुरी,कांदा,उडिद, ऊस,मका आदि पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता.

नुकसानीची पाहणी करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,माजी आमदार नारायण पाटिल, विधानपरिषद आमदार रणजीत सिंह मोहिते-पाटील आमदार संजय मामा शिंदे, तहसिलदार समीर माने, तालुका कृषी अधिकारी श्री. वाकडे, तलाठी चव्हाण सर्कल श्री. खराव यांनी पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठविला होता.

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या कडे पाठपुरावा केला. हा प्रश्न आमदार मोहिते-पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. अखेर हा अतिवृष्टी निधी मंजूर झाला आहे. तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.
अजित तळेकर (माजी सरपंच, केम)

अजित तळेकर

Related News :

सर्व शेतकऱ्यांच्या प्रयत्नामुळे
अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी मिळणार आहे – स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कोणीही याचे श्रेय घेऊ नये – अच्युत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!