देशी गायींना राज्य मातेचा दर्जा – रोपळे येथे गोरक्षकांनी काढली १०१ गोमातेची दिंडी
केम (संजय जाधव) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने ३० सप्टेंबर रोजी देशी गायींना राज्य मातेचा दर्जा देण्यात आला आहे. याबद्दल माढा तालुक्यातील रोपळे येथील गोरक्षकांनी गावातून १०१ गोमातेची दिंडी काढून आनंदोत्सव साजरा केला.
या निमित्ताने केम येथील ऊत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून गाईना पुरण पोळीचा नैवदय खावू घातला सर्व गोरक्षकानी जल्लोष केला. आम्ही आजपर्यत देशी गाईचा सांभाळ केल्याचे आज सोने झाल्याची भावना गोरक्षकांनी यावेळी व्यक्त करत महायुती शासनाने देशी गाईला गोमातेचा दर्जा दिल्याबद्ल मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
यासाठी किरण सुतार ,नवनाथ गोडगे, तानाजी मेहर, धनंजय पाटिल प्रशांत गोडगे, सुर्यकांत गोडगे, नाना खबाले हानुमंत दास आदिनी परिश्रम घेतले.गोरक्षकाना प्रोत्साहान मिळावे म्हणून पुढच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमेला गोमातेची दिंडी काढून तीन नंबर काढून बक्षीस देण्याचे ग्रामस्थांच्या वतीने जाहिर करण्यात आले. या कार्यक्रमाचे रोपळे व परिसरातून कौतूक केले.
वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत गायीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. मूळ गायींचे दूध, शेण आणि मूत्र हे आयुर्वेद, पंचगव्य उपचार आणि सेंद्रिय शेतीमध्ये मूल्यवान आहे. या क्षेत्रांमध्ये देशी गायींच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला अधिकृतपणे मान्यता देण्यात आली आहे.