शिवम चिखले याची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड
करमाळा (दि.१८) – करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवम चिखले याची शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या शालेय विभागीय स्तरीय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धात 17 वर्ष वयोगट मुलांमध्ये विभागातून विजय होऊन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धा नांदेड येथे दिनांक 18 व 19 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. 60 मीटरचे दोन अंतर त्यात 334 व दुसरा राउंड 336 असे एकूण 670 गुण घेऊन त्याची राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या यशस्वी विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.राम काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक,वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.