राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत करमाळा येथील कवी दादासाहेब पिसे यांचा प्रथम क्रमांक
करमाळा / संदेश प्रतिनिधी : अहमदनगर येथील जिज्ञासा अकादमी व विचारधारा यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री उत्सव 2023 राज्यस्तरीय “काव्यस्पर्धा” आयोजित केली होती. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, कवयित्री शर्मिला गोसावी ,आणि स्पर्धा प्रमुख कवयित्री सुरेखा घोलप, यांनी जबाबदारी पार पाडली आहे. या स्पर्धेकरिता राज्यभरातून कवी आलेले होते . यातून परीक्षकांनी खालील कवींच्या कवितांची निवड केली आहे. यात करमाळा येथील कवी दादासाहेब पिसे यांना प्रथम क्रमांक मिळाला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व 2000 रुपये रोख असे बक्षिसाचे स्वरूप होते.
- विजेते खालील प्रमाणे
- प्रथम क्रमांक – दादासाहेब सुभाष पिसे (करमाळा) विषय – माय सावित्री
- द्वितीय क्रमांक – वर्षा वसंतराव लगडे (लातूर), विषय – सावित्रीबाई आमच्यासाठी
- तृतीय क्रमांक – स्वाती किशोर अहिरे (चास), विषय – सावित्रीने घडविले
- उत्तेजनार्थ – अनुष्का पंडित, विषय – मी सावित्री बोलते, वेदिका दैठणकर – विषय – हक्क
- अहमदनगर गुणवंत कवी पुरस्कार – उपेंद्र निकाळजे,सुजाता पुरी,मनीषा गायकवाड – पटेकर,सुनील राऊत,दशरथ शिंदे यांना मिळाला.
कवी दादासाहेब पिसे हे गेल्या अनेक वर्षापासून कविता लिहित आहेत .त्यांनी वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या मार्मिक कविता लिहिल्या आहेत. नुकताच मागील वर्षी त्यांचा कवितासंग्रह ही ज्येष्ठ कवी व मान्यवराच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेला होता. कवी दादासाहेब पिसे यांनी मिळवलेल्या नावलौकिकामुळे करमाळा तालुक्यातील, राजकीय सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सर्व स्तरातून कवी दादासाहेब पिसे यांचं भरभरून कौतुक होत आहे.