अवकाळी पाऊस वाऱ्याने नुकसान झालेल्या केळी पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी : दिग्विजय बागल - Saptahik Sandesh

अवकाळी पाऊस वाऱ्याने नुकसान झालेल्या केळी पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी : दिग्विजय बागल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील सर्वच ठिकाणी वादळी वाऱ्याने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱ्यांना करणार असून, या नुकसान भरपाईसाठीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी सांगितले.

शेटफळ (ता.करमाळा) येथील नुकसान केळी पिकाची पाणी करून या शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या यावेळी त्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना मोबाईल वरून फोन करून या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या यावेळी त्या म्हणाल्या की कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या असून जे शेतकऱ्याचे पंचनामे राहिले असतील त्यांनी महसूल व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.


श्री.बागल यांनी शेटफळ येथील पांडुरंग नाईक नवरे धनाजी नाईकनवरे हंबीरराव नाईकनवरे प्रमोद पोळ, नानासाहेब पोळ साहेबराव पोळ यांच्या नुकसान झालेल्या ठिकाणी भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर बाजार समितीचे माजी संचालक चिंतामणी जगताप शेटफळ येथील मुरलीधर पोळ, वैभव पोळ , अशोक पोळ, वैभव नाईकनवरे, विशाल नाईकनवरे, महेश पोळ, नानासाहेब पोळ, मनोहर वीर,चेतन पोळ, लहू पोळ, ज्ञानेश्वर पोळ,तन्मय जाधव ॠषिकेश पोळ यांच्यासह या परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!