केम परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून पाहणी
केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम येथे गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे कोटयावधीचे नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व माजी आमदार नारायण पाटिल व कृषी अधिकारी वाकडे यांनी पाहणी केली.
सुरूवातीला केम गावचे ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबाचे दर्शन घेऊन श्री ऊत्तरेश्वर मंदिर परिसरातील पाहणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात केम गावचे प्रश्न जाणून घेतले. केमच्या जिव्हाळाचा प्रश्न म्हणजे रेल्वे थांबा या साठी श्री ऊत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मनोज सोलापूरे, सचिव मिलिंद नरखेडकर, कुंकू कारखानदार राजेंद्र गोडसे,आप्पा वैद्य,धनंजय सोलापूरे जेष्ठ नेते दिलीपदादा तळेकर, ऊपसरपंच नागनाथ तळेकर प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर यानी केमला पूर्वी थांबत असलेल्या चेन्नई-मुंबई मेल व हैदराबाद मुंबई या गाडयाचा थांबा कायम करावा किंवा सोलापूर जाणारी सकाळी कोणतीही एक्स्प्रेसला थांबा मिळावा, या साठी आमदार मोहिते पाटिल यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.
त्यांनी लगेच रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु आज रविवार असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. उद्या मी या संदर्भात रेल्वे प्रबंधकांशी बोलेन व पूर्वीचे थांबा साठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या वेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी भगवान देवकर यांच्या शेताची पाहणी केली. या वेळी भगवान देवकर यांच्याशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. या भेटीवरून त्यांच्या लक्षात आले की केम मध्ये किती नुकसान झाले. या साठी मी माजी आमदार नारायण पाटिल यांना बरोबर घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन येथील शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले.