केम येथील नलिनी बिचितकर यांचे निधन

केम (संजय जाधव) – नलिनी सर्जेराव बिचितकर यांचे हद्दय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष ६५ होते. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा, सुना,नातंवडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केम व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सर्जेराव बिचितकर यांच्या पत्नी होत्या तर पत्रकार सचिन बिचितकर यांच्या मातोश्री होत्या.