करमाळा आगाराला नवीन बसेस मिळाव्यात - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी - Saptahik Sandesh

करमाळा आगाराला नवीन बसेस मिळाव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

करमाळा(दि.१८) :  करमाळा एसटी आगारासाठी नवीन साध्या व ई-बसेस मिळाव्यात, तसेच नादुरुस्त बसेसची दुरुस्ती करण्यात याव्या अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना दिले.  मुंबई येथे पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली त्यावेळी हे निवेदन देण्यात आले.

या निवेदनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रावर शेरा मारून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना  लवकरात लवकर नवीन बसेस करमाळा आगारासाठी देण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी त्यांच्या निवेदनात म्हंटले आहे कि करमाळा तालुका हा अहमदनर, बीड, धाराशिव, पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला तालुका आहे व सर्व आसपासच्या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती करमाळा बसस्थानक आहे, करमाळा आगारातून करमाळा ते पंढरपूर, करमाळा ते अक्कलकोट, करमाळा ते अहमदनर – शिर्डी, करमाळा ते बार्शी – तुळजापूर अशा अनेक देवस्थानी व पुणे मुंबई सारख्या मोठं मोठ्या शहरात तसेच तालुक्यातील लहान लहान खेडेगावात रोज बसेस जातात, रोजच्या कमीत कमी 200 फेऱ्या होतात. सध्या करमाळा आगारात ऐकून 100 ते 125 बसेसची आवश्यकता असताना फक्त 65 बसेस धावत आहेत त्यात पण 2 ते 4 बसेस सोडल्या तर 99% बसेस ची दुरावस्था झालेली आहे. बस करमाळा आगारातून निघाल्यावर कुठे आड रस्त्यात बंद पडेल याचा नेम नाही. काही बसेच च्या खिडक्या तुटल्यात, काहींची दरवाजे तुटलेत, काही गाड्यांमध्ये बसायला सिट नाही यापेक्षाही भयंकर म्हणजे 99% गाडींचे इंजिनच नादुरुस्त असल्याने बसेस वेवस्थित चालत नाहीत त्यामुळे तालुक्यातील बस ने प्रवास करणारा प्रवाशी हा जीव मुठीत घेऊन रोज प्रवास करत आहे.

रोज वेगवेगळ्या भागात बसेसचे अपघात होतायत तर काही बसेस अर्ध्या रस्त्यात बंद पडतायत. त्यामुळे शाळेला जाणाऱ्या लहान लहान मुली, महिला भगिनी या रस्त्यावर उतरून जीव मुठीत घेऊन दुसऱ्या गाड्यांची वाट पाहतायत. हा सर्व प्रकार गेले 2 वर्ष झालं चालू असून आतापर्यंत कमीत कमी 50 वेळा बसेस चा अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. 2025 या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच करमाळा ते कर्जत हि बस पलटी होऊन तब्बल 38 प्रवाशी जबर जखमी झाले होते तरी देखील याची दखल कोणी घेतली नाही, आगार प्रमुख यांना वेळोवेळी वेगवेगळ्या संघटनांनी याबाबतीत निवेदन दिले तरी त्यांनी कायम दुर्लक्ष केले त्यामुळे जैसे थे वैशी परिस्थिती आज देखील आहे. गेल्या 10 वर्षांपासून करमाळा आगाराला 1 हि नवीन बस देण्यात आलेली नाही, आपल्याच महाराष्ट्र सरकारने जेष्ठ नागरिक व महिला भगिनींसाठी बसच्या तिकिटाच्या दारात सवलत देण्याची योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणी केली आहे त्या मुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला व जेष्ठ नागरिकांची गर्दी वाढलेली आहे, प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी एसटी महामंडळात ( MSRTC ) 2024 या वर्षांमध्ये 3 हजार 495 एसटी बसेस दाखल करण्यासाठी शासनाने मंजुरी पण दिली होती, तसेच महामंडळातर्फे 5150 ई -बसेस देखील भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. तरी या सर्व गोष्टींचा विचार करता  करमाळा आगारामध्ये कमीत कमी 50 ते 60 नवीन बसेस द्याव्यात, ई -बसेसची सेवा तालुका स्थरावर देण्यात यावी व  राहिलेल्या सर्व बसेस त्वरित दुरुस्त कराव्यात व तसे आपल्या स्तरावर निर्देश देण्यात यावेत 

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सोलापूर जिल्हा खजिनदार राजेंद्र सूर्यवंशी, विनायक खामगळ, सनी सुर्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!