महावितरणच्या कामात अडथळा आणणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

करमाळा(दि.१८) : डिपी मध्ये अनधिकृतपणे जोडलेली केबल काढून सरकारी वाहनात टाकण्यास प्रतिबंध करणाऱ्या आळजापूर (ता.करमाळा) येथील चौघांविरुद्ध महावितरणच्या करमाळा कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता विशाल सुर्यवंशी यांनी करमाळा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,१३ जानेवारीला दुपारी १२:३० च्या सुमारास महावितरणचे सरकारी कर्मचारी आळजापूर शिवारातील गपाट वस्तीवरील डिपीतून अनधिकृतपणे टाकलेली केबल काढीत असताना भारत रामचंद्र गपाट, ज्ञानदेव भारत गपाट, किसन पंढरीनाथ गपाट आणि अर्जुन भारत गपाट (सर्व रा. आळजापूर ता. करमाळा) या चौघांनी त्यांना केबल काढण्यास प्रतिबंध करुन, ढकलुन देऊन शासकिय कामकाजात अडथळा आणला. तसेच त्यानंतर आम्ही सरकारी
वाहनाने निघालो असताना जाण्यास प्रतिबंध केला.
या तक्रारीवरून करमाळा पोलिसांनी वरील चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.




