करमाळा तालुका शिवसेनेच्या अध्यक्षपदी देवानंद बागल
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुका शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल यांची निवड झाली आहे. ही निवड शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या पत्रान्वये करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षाची आज सोलापूर येथे झालेल्या बैठकीत श्री.बागल यांना नियुक्तीचे पत्र जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत व युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख महेश चिवटे, अमोल शिंदे, किरण चौरे, मनिष काळजे यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते.
श्री.बागल यांचेकडे करमाळा तालुका प्रमुख या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीचा कालावधी एक वर्षाचा आहे. बागल यांची निवड हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानूसार करण्यात आली आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण प्रचार आणि प्रसार करून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां चे नेतृत्व व आदेशाने करमाळा तालुक्यात काम करू. शिवसेना वाढीसाठी गावनिहाय शाखा निर्माण करून पक्षवाढीसाठी काम करू…देवानंद बागल (ता. प्रमुख, शिवसेना)