कुंभेज येथील दिंगबराव बागल विद्यालयाचा दहावी परिक्षेत 97.95 टक्के निकाल – यशाची परंपरा कायम..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कुंभेज (ता.करमाळा) येथील दिगंबरराव बागल विद्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या नुकतेच झालेल्या मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळवले आहे याबरोबरच शाळेत विविध उपक्रमांत ऊत्तुंग यश मिळवत असताना गुणवत्तेतही विद्यालयाने यशाची परंपरा अखंडित ठेवली आहे.

मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत कुंभेज येथील दिगंबरराव बागल माध्य. विद्यालयाचा एकूण निकाल 97.95 टक्के लागला असून प्रथम तीन गुणवंतांमध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. तृप्ती भारत सातव ही 91.60 % गुण प्रात करत विद्यालयात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

पल्लवी कुमार कादगे हीने 88.20% गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. तर समृध्दी सोमनाथ शिंदे हीने 83.60 % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. परीक्षेसाठी एकूण प्रविष्ट झालेल्या49 पैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 17 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. 16 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली तर 14 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थाध्यक्षा तसेच माजी आमदार शामलताई बागल, संस्थेच्या सचिवा रश्मी बागल, मार्गदर्शक दिग्वीजय बागल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असणारे मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांचे विशेष अभिनंदन केले तसेच मार्गदर्शक शिक्षक कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ, यांचेही अभिनंदन केले. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहकार्याबद्दल मान्यवरांनी कुंभेज व पोफळज ग्रामस्थांचे धन्यवाद व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!