करमाळा शहरातील सिंधी समाजामार्फत सर्व गणेश भक्तांना ‘महाप्रसादाचे वाटप’

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील सिंधी समाजामार्फत सर्व गणेश भक्तांना गणेश विसर्जन दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सिंधी समाजाची ही परंपरा दरवर्षी राबवली जाते.

गणेश विसर्जना दिवशी शहरातील सर्व गणेश मंडळ गणेश विसर्जन करण्याकरीता जात असताना मंडळातील सर्व सदस्यांना सिंधी समाजाच्यावतीने महाप्रसाद देण्यात येतो, याही वर्षी सिंधी समाजाच्या वतीने गणेश भक्तांना महाप्रसादामध्ये पुरी, भाजी, बुंदी असा प्रसाद देण्यात आला, याप्रसंगी अनेक गणेश मंडळांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला, यावेळी अनेकांनी सिंधी समाजाचे या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!