पोथरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष साळुंके - Saptahik Sandesh

पोथरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष साळुंके

अमोल साळुंके यांचा सन्मान करताना ग्रामस्थ

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.30: पोथरे येथील जिल्हा परिषदेच्या  केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष साळुंके तर उपाध्यक्षपदी विद्या शिंदे यांची निवड करण्यात आली

    दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन समिती नेमण्यात आली. पहिली ते सातवीच्या प्रत्येक वर्गातील पालक प्रतिनिधी म्हणून  एक-एक सदस्य निवडण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष पदासाठी सर्व सदस्यांची निवडणूक जाहीर  केली. त्यावेळी निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले. त्यानुसार अध्यक्षपदासाठी सर्वांच्या नावाच्या चिठ्या टाकण्याचे ठरले.  यामध्ये अमोल उर्फ संतोष साळुंके यांची अध्यक्षपदासाठी चिठ्ठी निघाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विद्या शिंदे यांची निवड करण्यात आली.


त्यांच्या निवडीनंतर केंद्रप्रमुख निशांत खारगे, मुख्याध्यापक गजेंद्र गुरव यांनी अभिनंदन केले. सचिव म्हणून मुख्याध्यापक गजेंद्र गुरव, शिक्षक तज्ञ म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब झिंजाडे तर सदस्य म्हणून प्रियंका जाधव, रुक्मिणी रंधवे, संध्या जाधव, हरिश्चंद्र नंदरगे, दादा ढावरे, रजनी जाधन, यशवंत शिंदे, सोनाली गोपणे यांची निवड करण्यात आली यावेळी सहशिक्षक दत्तात्रय मस्तूद, बापू रोकडे, शगुप्ता हुंडेकरी, शाबीरा मिर्झा, स्वाती गानबोटे, सविता शिरसकर,  उपसरपंच दिपाली जाधव, अनिल झिंजाडे, माजी अध्यक्ष बप्पा शिंदे, राज झिंजाडे, अंगद देवकते, सुरेश शिंदे, सुनिल पाटील, मुकेश जाधव, हरी नंदरगे, विठ्ठल रंदवे, नितिन साळुंके, दादा ढावरे, राजू हिरडे अशोक शिंदे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!