पांगरे येथील शंभूराजे स्वयंसहाय्यता बचत गटाकडून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – बलभीम बालकाश्रम पांगरे, येथील प्रवेशितांना शंभूराजे स्वयंसहाय्यता बचत गट पांगरे यांच्याकडून रंगीत कपडे,स्कूल बॅग, वॉटर बॅग, सर्व विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बचत गटाचे अध्यक्ष प्रदीप टेकाळे, सचिव बाळासाहेब गुटाळ व सदस्य अरुण शेंडगे, गणेश वडणे, महेश टेकाळे, सोमनाथ गुंजाळ, सुशांत वडणे व बापू जाधव हे उपस्थित होते. बचत गटाचे अध्यक्ष यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की आम्ही जे निराधार विद्यार्थी आहेत त्यांना आर्थिक मदत आमच्या बचत गटाकडून केली जाईल.
सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव संतोष नुस्ते व संस्था सदस्य प्रा.पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लिमगिरे यांनी केले व प्राचार्य श्री भोसले यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.