केम येथील अच्युत पाटील यांच्याकडून २११ जणांना शिधा किट वाटप
केम (प्रतिनिधी- संजय जाधव) : केम तालुका करमाळा येथील एपी ग्रुपचे संस्थापक अच्युत (काका) पाटील यांच्या वतीने गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने एकूण २११ शिधा किटचे वाटप करण्यात आले.
या मध्ये पाच किलो साखर, मोती साबण व ऊटणे पाकिट असे साहित्य होते. या वर्षी सतत पडणारे पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यांना एक दिलासा म्हणून दिवाळी गोड होईल या हेतूनेच हे वाटप करण्यात आले .
या वेळी महेश तळेकर पैलवान महावीर , तळेकर, वसंत तळेकर,मारूती पारखे, नितीन तळेकर विजय ओहोळ, सचिन बिचीतकर, पिनु तळेकर कुंडलिक तळेकर,रमेश तळेकर, सागर कुरडे विष्णू अवघडे, भारत नागने , समाधान गुरव अक्षय तळेकर, मदन तात्या तळेकर नवनाथ खानट, दिपक भिताडे शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वर्षा ताई चव्हाण संजय नागणे शिवाजी मोळिक रामचंद्र तळेकर, ओंकार जाधव संग्राम तळेकर बापुराव नेते तळेकर नाना गव्हाणे बापुराव तळेकर,,युवराज तळेकर,युवा सेनेचे जिल्हा समन्वयक सागर तळेकर पांडुरंग तळेकर देवकर गुरूजी प्रहार संघटनेचे ता, अध्यक्ष संदिप तळेकर आदि उपस्थित होते.