२४ वर्षानंतर भरलेल्या वडशिवणे तलावाचे करण्यात आले पूजन
केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : वडशिवणे (ता.करमाळा) येथील ब्रिटिश कालीन तलाव यावर्षी पावसाच्या पाण्याने 100 टक्के भरल्यामुळे आदर्श महिला ग्रामसंघ व नेहरू युवा मंडळ यांच्या तर्फे संयुक्तपणे या पाण्याचे पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून पूजन करण्यात आले.
तलावाच्या 500 फूट परिसरातून सांडवा वाहू लागला आहे. हा तलाव सन 1901 साली बांधलेला ब्रिटिशकालीन तलाव यावर्षी असून 136 हेक्टर परिसरात पसरलेला आहे. 4 ते 5 किमी लांबीच्या दोन कॅनॉल च्या माध्यमातून जवळपास नऊशे एकर क्षेत्र ओलिताखाली येते.या तलावाचे व्यवस्थापन करण्यासाठी दोन कामगार वसाहती, एक शासकीय विश्रामगृह ,घोडे बांधण्यासाठी तबेला,स्वच्छता गृह ,पाण्याची विहीर व पर्जन्यमापक यंत्र बांधलेले आहे. यावेळी नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत सरकार, माजी उपसरपंच तथा ग्रामसंघाच्या अध्यक्ष अनिता राऊत,कोषाध्यक्ष मुमताज मणेरी,प्रज्ञा राऊत सरकार,पुनम कळसाईत,आशा कळसाईत,रुपाली कळसाईत उपस्थित होते.