कोर्टी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शंभूराजे जगताप यांचेकडून शालेय साहित्याचे वाटप..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी पालकांनी दुरदृष्टी ठेवून गावच्या विकासासाठी लोकसहभागातून सहकार्य करावे, कोर्टी गावच्या विद्यार्थ्यांना भविष्यातही सर्वतोपरी मदत करू गरज पडल्यास केव्हाही आवाज द्या, मदतीसाठी सदैव तत्पर राहु असे आवाहन जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना केले.
३ जानेवारी रोजी जि .प .प्राथमिक शाळेने बालिका दिनानिमित्त स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून शंभूराजेंना प्रमूख अतिथी म्हणून निमंत्रीत केले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना शंभूराजेनी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करू असे आश्वासन दिले होते. तो दिलेला शब्द पाळत शंभूराजे नी प्रत्यक्ष : २५ जानेवारी रोजी शाळेत येऊन वह्या ,पेन सारखा अत्यावश्यक शालेय साहित्याचे तब्बल १५० विद्यार्थ्यांना वाटप केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमंत झाकणे हे होते, तर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष इकबाल इनामदार, सागर शेटे, मनोज धुमाळ , अमोल काळे, प्रितम कुटे , विदेश साळुंके, शुभम कात्रेला मुख्याध्यापक विशाल शहाणे आदिसंह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह शिक्षिका लक्ष्मी बहीर यांनी केले . सूत्रसंचालन सचिन नवले यांनी तर आभार संतोष महाडीक यांनी केले.