राज्यस्तरीय थाळी फेक स्पर्धेत केम मधील ओंकार घाडगे तृतीय

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज मधील खेळाडू ओंकार घाडगे या विद्यार्थ्याने आज (दि.२९) पुणे या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेतील थाळीफेक या प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला आहे.पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल (बालेवाडी) येथे या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा विविध पातळीवर आयोजित केलेल्या स्पर्धेतून निवडलेले खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले होते.
ओंकारने करमाळा येथे झालेल्या तालुकास्तरीय व पंढरपूर येथे झालेल्या विभागीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.

ओंकारला क्रीडा शिक्षक प्रा.अमोल तळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे वडील श्री धनंजय घाडगे यांनी त्याला या खेळासाठी प्रेरणा देऊन प्रोत्साहन दिले.
ओंकार घाडगेच्या या राज्यस्तरीय यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे, संस्था सीईओ श्री कौस्तुभजी गावडे, कर्तव्यदक्ष मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख , प्राचार्य श्री एस.बी.कदम , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी त्यास प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे, श्री कुंडलिक वाघमारे, श्री सरफराज मोमीन यांनी सहकार्य केले. या राज्यस्तरीय यशाबद्दल ओंकार घाडगेचे केम परिसरातुन कौतुक होत आहे.