घारगाव जि.प. शाळेत श्री गणेश आरती संग्रह पुस्तकाचे वाटप
करमाळा (दि.१०) – गणेश उत्सवाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव येथे काल दि.९ रोजी घारगावच्या माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी सरवदे यांचेकडून श्री गणेश आरती संग्रह पुस्तकांचे वाटप करण्यात आले
यावेळी माजी सरपंच सौ लक्ष्मी सरवदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या गणेश उत्सव हा बुद्धीचा दाता असलेल्या श्री गणेशाचा सण आहे समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून गणेश उत्सवात विद्येची देवता असलेल्या गणराया चरणी हार, फुले, मोदकासह वह्या, पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य गणेश भक्तांनी अर्पण करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच आशा देशमुखे, उपसरपंच दत्तात्रय मस्तुद, माजी सरपंच लोचना पाटील, माजी सरपंच अनिता भोसले, मा.उपसरपंच सतीश पवार ग्रामपंचायत सदस्या कविताताई होगले माजी सरपंच रामलीग अण्णा देशमुखे माजी सरपंच बबन बारस्कर, नवनाथ देशमुखे व विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक वर्ग आजी माजी सरपंच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ उपस्थित होते.