राजुरी येथील माजी मुख्याध्यापक सुखदेव साखरे यांचे निधन
करमाळा (दि.१०) – राजुरी (ता.करमाळा) येथील श्री राजेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुखदेव साखरे यांचे काल दि.९ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र
झटक्याने निधन झाले.
त्यांच्यावर ९ सप्टेंबर रोजी राजुरी येथील हिंदू स्मशानभूमीत
सायंकाळी साडेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा, ३ मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
करारी, ध्येयवादी, शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ते परिचित होते. डी. एस.साखरे सरांचे ते वडील होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत
आहे.