कंदर ग्रामपंचायत वर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे वर्चस्व.. - Saptahik Sandesh

कंदर ग्रामपंचायत वर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे वर्चस्व..

कंदर प्रतिनिधी /संदीप कांबळे..

करमाळा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या कंदर येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकी मध्ये सरपंच पदासाठी पाच उमेदवारा मध्ये लढत होऊन ग्रामविकास परिवर्तन पॅनल चे मौलासाहेब मुलाणी विजयी झाले आहेत .ग्रामपंचायत सदस्या मध्ये तिरंगी लढत होऊन ग्रामविकास परिवर्तन पॅनल ने आठ जागेवर विजय मिळवून सत्ताधारी गटाचा पराभव करित विजय मिळविला आहे.

कंदर ग्रामपंचायती मध्ये १५ जागेसाठी कंदर विकास परिवर्तन पॅनल आणि कट्टर विरोधक असणारे बागल गट आणि ग्रामविकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत कंदर ग्रामविकास परिवर्तन ला आठ , ग्रामविकास आघाडीला तीन बागल गटाला चार अशा प्रकारे जागा मिळाले आहेत , गेल्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये भांगे गटाने तिरंगी लढत होऊन सरपंच पद मिळविले होते.

या निवडणुकीत भांगे आणि बागल गट यांनी युती करून निवडणुक लढवण्याचा प्रयत्न केला . परंतु जागे वाटपावरून वाद झाल्याने युती फिसकटली आणि शेवटी परस्पर विरोधी उभे राहिले. ग्रामविकास परिवर्तन पॅनल चे विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे सरपंच मौलासाहेब मुलाणी (१२००), उदयसिंह नवनाथ शिंदे (४४९), राशीदा रशीद शेख (३७२), कमल बाळु लोंढे (२८३), अमोल मधुकर भांगे(३६२), रतन भारत भोसले(२९२), दीपक प्रभाकर घोडकोस (३६९), तब्बूसुम इकबाल हवालदार (३७८), अनिता बाबुराव मंजुळे (२५३),

ग्रामविकास आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- राहुल राजकुमार भांगे(३६६), अरुण यादव (367) वैष्णवी नवले(340) बागल गट-सौ नवल भैरवनाथ डोके(252), रावसाहेब शंकर जाधव(३५५), कुबेर नवनाथ शिंदे(२७८), शालन ब्रम्हदेव अरकिले(२९९), ग्रामविकास परिवर्तन पॅनल मधील नवनाथ शिंदे, अण्णासाहेब पवार, संपत सरडे,राजकुमार सरडे ,शिवशंकर माने दाउत मुलानी मौलासाहेब मुलानी ,दिलावर शेख, विठ्ठल काळे, आखलाख जहागीदार, दस्तगीर मुलानी आदी नी विजय मिळविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

एकूण सदस्यांमध्ये वार्ड क्रमांक एक मधील परिवर्तन पॅनलचे उदयसिंह नवनाथ शिंदे हे सुमारे 300 मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. सरपंच पदासाठी एकूण पाच जन रिंगणात होते यामध्ये तिन्ही गटाकडून तीन आणि दोन अपक्ष उभे होते पैलवान उमेश इंगळे हे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि त्यांनी जोराचा प्रचार करून तीन नंबरचे मते मिळवली आहेत. ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला . गुलालाची
मुक्तपणे उधळण केली . फटाक्यांची आतिषबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!