माजी उपनगराध्यक्ष सुमित्रा घोलप यांच्याकडून श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास देणगी प्रदान -

माजी उपनगराध्यक्ष सुमित्रा घोलप यांच्याकडून श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास देणगी प्रदान

0

करमाळा (दि.१): करमाळा नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष सुमित्रा बाळासाहेब घोलप यांच्याकडून श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास   अकरा हजार रुपये रोख देणगी आज (दि.१)  नववर्षा निमित्त बुधवार दिनांक ०१.०१.२०२५ रोजी देण्यात आली.

श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या १ वर्षा पासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून ट्रस्ट चे  अध्यक्ष सोमनाथ चिवटे  सचिव अनिल पाटील व सर्व विश्वस्त यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले होते. या आव्हानास प्रतिसाद म्हणून घोलप यांनी ही वर्गणी त्यांनी

या निमित्त त्यांचा सत्कार श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून  मानकरी माजी सरपंच सौ. स्वाती भाऊसाहेब फुलारी ,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्ष सोमनाथ चिवटे  सचिव अनिल पाटील विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर सुशील राठोड, ॲड  शिरीषकुमार लोणकर,
बापू पुजारी, तुषार सोरटे, सहदेव सोरटे, नितीन घोलप,  महेश चिवटे , यशराज नितीन घोलप, भाऊसाहेब फुलारी, व्यवस्थापक अशोक गाठे, उपस्थित होते.

या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णध्दाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील मंदिर समिती च्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध असून अशोक गाठे (मो. नंबर ९४०४७०८९२४) यांना संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!