नदीपात्रात पाणी नसल्याने दशक्रिया विधीसाठी नरुटे परिवाराकडून करण्यात आली पाण्याची व्यवस्था

करमाळा(दि.२५) : बोरगाव (ता. करमाळा) येथील नरुटे परिवाराच्यावतीने स्व. सौ. सुंदरबाई मुरलीधर नरुटे यांच्या स्मरणार्थ संगोबा येथील दशक्रिया विधी कार्यक्रमास कायमस्वरुपी पाणी टाकी व पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
तीर्थक्षेत्र संगोबा येथील सीना नदीच्या पात्रालगत नरुटे परिवाराच्या शेतामध्ये दररोज अनेक दशक्रिया विधी कार्यक्रम होत आहेत. सध्याची उन्हाळ्यामुळे नदीपात्रात कसलेच पाणी नाही. जे आहे त्या खड्ड्यातील पाण्यात आळ्या,किडे होवून त्याची दुर्गंधी येते. यावेळी दशक्रिया विधीला आलेले सर्व कुटुंब व त्यांचे नातेवाईक अतिशय दु:खी असतात. त्यातच त्यांना घरुन ट्रॅक्टर व इतर वाहनातून पाणी आणावे लागते. ही सर्व परिस्थीती नरुटे परिवारातील सदस्यांनी पाहिली आणि ॲड प्रा. शशिकांत नरुटे व त्यांच्या वस्तीवरील सर्वांनी लगेच निर्णय घेऊन या ठिकाणी पाण्याची टाकी आणि पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (दि.२४) संध्याकाळी नेहमीप्रमाणे रामकृष्ण हरी वारकरी बीज मंत्रांचा जप व अन्नछत्र मंडळाकडून महाप्रसादाचे नियोजन असते तिथेच या टाकीचे पूजन करुन तीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी या टाकीचे पूजन मंदिराचे पुजारी श्री प्रविण गायकवाड व काकासाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नरुटे परिवाराकडून पंडित नरुटे ज्ञानदेव नरुटे ॲड. प्रा. शशिकांत नरुटे, प्रा. श्रीकांत दरगुडे धनाजी नरुटे, विनेश नरुटे, बाळू नरुटे,कालिदास नरुटे, तुकाराम नरुटे,दिलीप काळे, दादासाहेब नरुटे, आण्णासाहेब सुपनवर, सुंदर हाके, निलजचे चांगदेव गायकवाड, रामभाऊ गायकवाड, किशोर शिंदे,राजाभाऊ रुपनवर, शिवाजी भोज विठ्ठल नाळे, साहेब सोनू नाळे तुकाराम नाळे,पप्पू मस्के, सुंदर हाकेज आबा वायकुळे आबा टकले गहिनीनाथ गायकवाड, बळीराम गायकवाड, बाळे वाडीचे नलवडे मिसाळ पाटील, मच्छिंद्र मस्के, गोपीनाथ मारकड,तुकाराम कोळेकर, सतिश गायकवाड, बाळू भोगल,किसन भोगल, सुधीर भोगल, अरुण शिंदे, चेअरमन राजेंद्र चिवटे, शिवशंकर वांगडे,पिंटूशेठ गुगळे, ॲड अमर शिंगाडे, सनी धेंडे तसेच बहुसंख्येने पुरुष महिला माता भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आण्णा सुपनवर यांनी केले. आभार प्रा. नरुटे सर यांनी मानले.

उन्हाळ्यात सीनानदीत पाणी नाही. दशक्रियेसाठी आलेले कुटुंब व त्यांचे दु:ख बघवत नव्हते. यातच अंघोळ करण्यासाठी घरुन पाणी आणले जात होते. हे ही बघवत नव्हते. म्हणून आम्ही नरुटे परिवाराकडून निर्णय घेतला. माझी आई आदर्श माता होती. तिने अनेकांची दु:ख वाटून घेतली. तिने भूकेल्यांना भाकर, तहानलेल्यांना पाणी दिले. तिचे स्मरणार्थ ही सुविधा उपलब्ध केली. आम्हाला आमचे आजोबा कै. विठोबा नरुटे व आजी कै हौसाबाई नरुटे यांचा वसा व वारसा लाभलेला आहे.
● ॲड प्रा. शशिकांत नरुटे
संबंधित बातमी :




