युवासेनेच्या वतीने करमाळा येथे मोफत सीईटी सराव परिक्षांचे आयोजन - Saptahik Sandesh

युवासेनेच्या वतीने करमाळा येथे मोफत सीईटी सराव परिक्षांचे आयोजन

केम(संजय जाधव) : अकरावी, बारावी व पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी युवासेना- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे २९ मार्च रोजी मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिली आहे.

यावेळेस अधिक बोलतना फरतडे म्हणाले की शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सलग सहा वर्षापासून राज्यभरात हि परिक्षा घेतली जात होती मात्र करमाळा तालुक्यातील विद्यार्थांना पहिल्यांदाच हि संधी उपलब्ध होत आहे.

ऑफलाईन पद्धतीने हि परिक्षा घेतली जाणार असून परिक्षा फाॅर्म भरण्यासाठी युवासेनेकडुन ऑनलाइन संकेत स्थळ देण्यात आले आहे, www.yuvasenacet.com या संकेत स्थळावरून किवां स्कॅनर कोड उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यावर तात्काळ स्कॅन करून आपला फार्म भरणे बंधनकारक आहे .

ही सराव परीक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी व फार्मसी शाखांच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) साठी उपयुक्त ठरणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणारी हि परिक्षा शनिवार, 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत करमाळा शहरातील सुप्रसिद्ध ग्लोबल सायन्स इन्सिट्युट येथे पार पडणार आहे. तालुक्यातील जास्ती जास्त विद्यार्थांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे 8600064545 व प्रा महेश निकत सर 9860878234 यांच्याशी संपर्क साधावा असे अवहान युवासेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

परिक्षा यशस्वी करण्यासाठी उप जिल्हाप्रमुख मयुर यादव, जिल्हा समन्वयक सागर तळेकर, शहर प्रमुख समिर परदेशी, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, समन्वयक कुमार माने उपशहरप्रमुख आदित्य जाधव ,युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर उप तालुकाप्रमुख अभिषेक माने ,विभाग प्रमुख ओंकार कोठारे गट प्रमूख मयुर तावरे विशाल नवगन काॅलेज कक्ष चे अमिर कबीर आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!