माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका संघटक पदी रामदास कांबळे यांची निवड

करमाळा (दि.२८) – माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन मुंबई या सामाजिक संघटनेच्या करमाळा तालुका संघटकपदी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केली आहे. कांबळे हे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात त्यांचे हे कार्य पाहून आपण त्यांची निवड केलेली बसवेकर यांनी सांगितले.

या निवडीबद्दल बोलताना कांबळे यांनी सांगितले की आपण या पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या व्यापक जनहितासाठी वापर करणार आहोत तसेच सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिनियम २००५ च्या प्रसार व प्रचार करण्याचे कार्य आपण करणार आहोत असे ते म्हणाले, या निवडीबद्दल समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.




