ट्रॅक्टर अपघातात वारकरी ठार – पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : पंढरपूरहून परत येत असताना जातेगाव (ता. करमाळा) वारकऱ्यास ट्रॅक्टरने धडक देऊन झालेल्या अपघातात ६० वर्षाचे वारकरी गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत. हा अपघात १८ जुलैला दुपारी दीड वाजता घडला आहे. या प्रकरणी करमाळा पोलीसात २६ ऑगस्टला गुन्हा दाखल झाला आहे.
यात नानासाहेब बाळासाहेब हरिश्चंद्र (रा. खडांबेखुर्द, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझे वडील बाळासाहेब बापूराव हरिश्चंद्र (वय ६०) हे पंढरपूरहून परत येत असताना जातेगाव जवळ ट्रॅक्टर चालक अशोक सखाराम गवते याने त्यांना जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले त्यातच ते मरण पावले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.





