भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडी तालुकाध्यक्षपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी उद्योजक आघाडी करमाळा तालुकाध्यक्षपदी उद्योजक अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संघटना नाशिक केंद्र करमाळा तालुका अध्यक्ष राजुरी गावचे संतोष काका कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे ,शहराध्यक्ष रामभाऊ ढाणे यांनी निवड पत्र देऊन त्यांची निवड केली आहे. उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांनी एक शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही कुठलाही वारसा नसताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वकर्तुत्वावर क्लासिक ऑइल कंपनी सुरू केली. रोजगारनिर्मिती उद्योग व्यवसायिकांना त्यांचे कार्य युवा पिढीला प्रेरणादायी आहे असे मत गणेश चिवटे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टी उद्योजक विकास आघाडीच्या माध्यमातून करमाळा युवकांना मार्गदर्शन करून उद्योजक घडवण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संतोष काका कुलकर्णी यांचा हार फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.