उद्योजक सोमनाथ खराडे यांचा भीमारत्न पुरस्कार देऊन गौरव..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : एसके इंजिनिअर्स अॕन्ड सर्व्हिसेस आणि स्टार्टअप बिजनेस अवाॕर्ड २०२२ चे विजेते वांगी गावचे सुपुत्र सोमनाथ बाळू खराडे यांच्या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय अशा कार्याची दखल घेत यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ करे-पाटील यांच्यावतीने त्यांना भीमारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण सोहळा ढोकरी येथे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य विद्यमान आमदार व माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील व मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते तसेच मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
भीमारत्न पुरस्कार हा भीमा नदीच्या खोऱ्यातील कर्तृत्व संपन्न , ज्ञानवंत , गुणवंत आणि किर्तिवंत अशा व्यक्तिमत्वांचा केलेला यथोचित असा सन्मान आहे. भीमारत्न पुरस्कार हा आपल्याच मातीत व आपल्याच माणसांकडून मिळाल्यामुळे उद्योग क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी मोठी ताकद आणि ऊर्जा मिळाली असल्याचे सोमनाथ खराडे यांनी सांगितले.
भीमारत्न पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर सर, महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या पाटील , अर्जुन आबा तकीक , वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके तसेच सर्व ढोकरी ग्रामस्त यांनी अथक परिश्रम घेतले.