पोलीसपाटील भरतीचा अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा व माढा तालुक्यातील पोलीस पाटील भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत २ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. सलग आलेल्या शासकीय सुट्ट्यामुळे ३ ऑक्टोबर ऐवजी ५ ऑक्टोबर करण्यात आली असल्याची माहिती पोलीस पाटील निवड समितीच्या अध्यक्ष तथा माढा विभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी प्रियंका आंबेकर यांनी या विषयीचा जाहीरनामा प्रसिध्द केला आहे.
त्यात म्हटले आहे की, “या आधी १४/०९/२०२३ रोजी जो जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आलेला होता, त्यामध्ये ज्या व्यक्तीस पोलीस पाटील म्हणुन काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी आपले अर्ज दिनांक १८/०९/२०२३ पासुन दि. ०३/१०/२०२३ पर्यंत (शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय माढा विभाग कुर्डुवाडी येथे समक्ष सादर करणेबाबत कळविणेत आले होते. तथापी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडील आदेशानुसार अनंत चतुर्थीची दि. २८/०९/२०२३ रोजीची स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. तसेच दि.२९/०९/२०२३ ते २/१०/२०२३ पर्यंत सलग शासकीय सुट्टी आलेने, अर्जदारास पुराव्याची कागदपत्रे विहीत मुदतीत जमा करणेस शक्य होणार नाही, ही बाब निदर्शनास आल्याने उमेदवारास अर्ज करणेची मुदत वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवारांना मुदत वाढ देण्याचे ठरविले असून त्यानुसार अर्ज दिनांक दि.०३/१०/२०२३ ऐवजी दि. ०५/१०/२०२३ पर्यंत ( शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी यांचे कार्यालयात समक्ष सादर करावेत. या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच दि.१४/०९/२०२३ रोजीच्या जाहिनाम्यातील इतर कोणताही बदल नाही.” अशी माहिती नवीन जाहीरनाम्यात दिली आहे.