प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांचे करमाळ्यात व्याख्यान आयोजित

करमाळा(दि.१): येत्या गुरुवारी (दि.६) करमाळा येथे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे ‘भविष्यावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या ठिकाणी सकाळी ११ वाजता हे व्याख्यान होणार आहे.
श्री.घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमही यशवंत परिवाराच्या वतीने आयोजित केले आहेत. रांगोळी स्पर्धा, मिस मॅच डे यासह शनिवारी (ता. 1) संगीत खुर्ची व लिंबू चमचा होणार आहे. सोमवारी (ता. 3) रॅम्प वॉक, मिस वाय. सी.एम. व शेलापागोट्याच्या कार्यक्रम आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. 4) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सकाळी 10 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (ता. 5) सकाळी 10 वाजता रक्तदान शिबिर होणार आहे. गुरुवारी (ता. 6) सकाळी 10 वाजता यशवंत परिवाराच्या वतीने परिवाराचे विलासराव घुमरे यांचा सन्मान सोहळा होणार आहे.
गणेश शिंदे हे महाराष्ट्रातील एक युवा व्याख्याते, लेखक, संतचरित्रावर, शिवचरित्रावर व ग्रामीण भागातील प्रश्नांवरही बोलतात. अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये ते सॉफ़्टस्किल डेव्हलपमेंट,या विषयांवर त्यांची व्याख्याने होतात. शाळा,महाविद्यालयापासून तर महाराष्ट्र शासनाच्या ‘यशदा’ या शिखर संस्थेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत अनेक ठिकाणी गणेश शिंदे यांच्या व्याख्यानांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे.







