दारू पिवून ट्रॅक्टर चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल

करमाळा(दि.२८) : दारू पिवून करमाळा – बायपास रस्त्यावर ट्रॅक्टर चालविणाऱ्या ट्रॅक्ट चालकावर करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकर २५ जानेवारीला दुपारी पावणेएकच्या सुमारास जयहिंद हॉटेल समोर बायपासला घडला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिपक नागनाथ कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की करमाळा शहरातील वाहतुकीचे नियमन करत असताना बायपास रस्त्यावर जयहिंद हॉटेल समोर ट्रॅक्टर क्र. एमएच ०९ एफ व्ही ५७८२ वरील चालक रविकिरण शिवाजी खोत (रा. खडकलाट, ता.चिकोडी, जि.बेळगाव) हा ट्रॅक्टर अडथळत चालवत होता. त्यास थांबविले असता, तो दारू पिलेला आढळून आला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अशाचप्रकारे दुपारी एक वाजता याच ठिकाणी रामेश्वर बाबु सुरवसे (रा. श्रीपुर, ता. माळशिरस) हा ही आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर दारू पिऊन चालविताना आढळून आला त्यामुळे त्याच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






