अशोक चोपडे यांचे शेतातच रक्षाविसर्जन करून नातेवाईकांनी केले स्मृती वृक्षाचे रोपण.. - Saptahik Sandesh

अशोक चोपडे यांचे शेतातच रक्षाविसर्जन करून नातेवाईकांनी केले स्मृती वृक्षाचे रोपण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : चाकोरे ता.माळशिरस येथील प्रगतशील शेतकरी अशोक चोपडे (वय ६४ वर्षे) यांचे रविवार दि. २६ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखःद निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीनंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे सावडण्याच्या दिवशी त्यांची रक्षा ही पारंपरिकरित्या नदीपात्रामध्ये विसर्जीत न करता त्यांच्या स्वतःच्या शेतातच खड्डा खोदून त्यात रक्षा विसर्जन करण्यात आले व त्याजागी स्मृतीवृक्षाचे रोपन करुन आपल्या वडिलांच्या स्मृती जपण्याचा स्तुत्य व अनोखा प्रयत्न त्यांच्या मुली मोक्षदा, हर्षदा, मुलगा गणेश व सून पूनम यांनी आज केला.

या उपक्रमाची कल्पना त्यांचे जेष्ठ जावई व मोक्षदाचे पती प्रा.डॉ.हनुमंत लोखंडे यांनी मांडली व त्यास चोपडे यांचे बंधू सुरेश चोपडे, पुतणे मनोज, समीर, योगेश, मेहुणे ॲड सोमनाथ वाघमोडे, दत्तु वाघमोडे, दादासाहेब वाघमोडे, जावई डॉ. संदीप खताळ, व नातेवाईक ज्ञानदा वाघमोडे, नवनाथ कचरे, प्रा. नानासाहेब घुले, दत्ता बरकडे, हनुमंत कपणे , विकास पाटील, राजेंद्र पाटील, अंकुश झारगड, विठ्ठल काळे इत्यादीनी सहमती दर्शविली. चोपडे कुटुंबीयांच्या या प्रागतिक भूमिकेचे परिसरातून कौतुक केले जात असून अशा पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल आदर व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!