सरपडोह येथे जुगार खेळणाऱ्यावर धाड – दिड लाखाचा ऐवज जप्त

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सरपडोह येथे जुगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून १ लाख ५३ हजार २० रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. हा प्रकार २५ जानेवारीला सव्वाचार वाजता सरपडोह येथील सर्पनाथ मंदिराच्या शेजारी घडला आहे.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल जोतिराम बारकुंड यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की सरपडोह येथे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक टिळेकर, पोलीस हवालदार ढेंबरे, श्री. शेख, पोलीस नाईक पवार, श्री. गोरे असे आम्ही २५ जानेवारीला दुपारी सव्वाचार वाजता तिथे गेलो असता, तेथे अभिमान भिकाजी भिताडे, गणेश नवनाथ पवार, शिवाजी कुडद्या काळे, बाळनाथ चंद्रकांत नांगरे (सर्व राहणार सरपडोह), राजेंद्र गोरख गायकवाड व हनुमंत भागवत देवकर (रा. वरकटणे) हे जुगार खेळत असताना आढळून आले. त्यांच्याकडून ३ हजार २० रूपये रोख तर चार मोटारसायकली दीड लाख किंमतीच्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.




