इतिहासात प्रथमच म्हसेवाडीसाठी सुरू झाली बससेवा – चालक वाहकांचा ग्रामस्थांनी केला सत्कार

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील म्हसेवाडी साठी इतिहासात प्रथमच एसटी बस सेवा सुरू झाली आहे.  करमाळा – पांडे – म्हसेवाडी ही बस सेवा २०२४ च्या नवीन वर्षात दि.४ जानेवारीपासून सुरू झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नवीन बस सेवा सुरू झाल्या निमित्त बसचे चालक नागनाथ चव्हाण आणि वाहक बालाजी तुंदारे यांचा सन्मान ग्रामस्थांनी केला.

आ. संजयमामा शिंदे यांनी जानेवारी २०२३ मध्ये करमाळा मतदारसंघाचा गाव भेट दौरा केला होता. या गावभेट दौऱ्यात गावकऱ्यांकडून आलेल्या विविध मागण्या,समस्या यावरती तोडगा काढून उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी त्या त्या विभागाला सूचना दिलेल्या होत्या, त्या विभागाच्या बैठका घेतल्या होत्या. त्यानुसारच करमाळा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये अद्यापही बस सेवा सुरू झालेली नव्हती अशा गावांमध्ये बस सुरू करण्यासंदर्भात आ. संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेले होत्या, त्यानुसार अखेर २०२४ मध्ये ही एसटी सुरू करण्यात आली. सदर बस चालू करण्यासाठी अंकुश पाटुळे आणि संतोष ननवरे यांनी विशेष पाठपुरावा केला. 

याप्रसंगी अर्जुननगर – म्हसेवाडी चे उपसरपंच मा.त्रिंबक भाऊ ननवरे, चंद्रकांत पाटुळे,पानाचंद बंडगर, भाऊसाहेब अडसुळ,अंकुश पाटुळे, सुनील लोखंडे,दिपक ननवरे,माधव पाटुळे,विलास ननवरे, अशोक लोखंडे, संतोष ननवरे, हरिश्चंद्र बंडगर,पोपट बिचकुले, नागनाथ ननवरे, अर्जुन खरात,खंडु ननवरे, रमेश ननवरे, दिपक लोखंडे, महादेव पाटुळे, अशोक ननवरे, सुदाम आदलिंग आबा पाटुळे आदी ग्रामस्थांसह विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!