पत्रकारांनी निर्भयपणे व पारदर्शकपणे काम केले पाहिजे- माजी आमदार जगताप
करमाळा, ता. १७ : पत्रकारांनी निर्भयपणे व पारदर्शकपणे काम केले पाहिजे, तरच पत्रकाराची समाजात चांगल्या प्रकारे प्रतिमा राहते, असे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले. काय सांगता या न्यूज पोर्टलच्या वतीने काढण्यात आलेल्या डिजीटल विशेषकांचे उद्घाटन करताना व सन्माननीय गणेश मंडळे व व्यक्तींचा सत्कार करताना झालेल्या कार्यक्रमांक प्रमुख पाहुणे म्हणून श्री. जगताप बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, की अशोक मुरूमकर यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आधुनिक पोर्टलची पत्रकारीता सुरू केली व ती यशस्वी केली. त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे, त्यांना योग्य ती मदत केली पाहिजे. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, पोलीस उप निरीक्षक प्रविणकुमार साने, डॉ. घोलप, डॉ. रवि पवार, डॉ. कविता कांबळे, अॅड. डॉ. बाबूराव हिरडे हे उपस्थित होते.
यावेळी पुस्तक प्रकाशनाबरोबरच शहरातील गणेश मंडळे, सरकार मित्र मंडळ, गजराज मित्र मंडळ, दत्तपेठ मंडळ, मेन रोड मंडळ,राशीनपेठ तरूण मंडळ, या मंडळाबरोबरच डॉ. स्वाती घाडगे, डॉ. शिवाणी रोहन पाटील व शेतकरी परिवारातील महिला हर्षानी नाईकनवरे, सामाजिक कार्यकर्ते श्रेणीकशेठ खाटेर, प्रा.नितीन तळपाडे यांच्या मातोश्री अनुसया तळपाडे , पोथरे येथील शिवरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे, आदींचे सत्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, डॉ. घोलप, विलासराव घुमरे, डॉ. कविता कांबळे, डॉ. अॅड. हिरडे, श्रेणीकशेठ खाटेर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार किशोरकुमार शिंदे यांनी केले तर आभार पत्रकार अण्णा काळे यांनी मानले उपस्थिांचे स्वागत काय सांगता चे प्रमुख अशोक मुरूमकर पत्रकार नानासाहेब घोलप, पत्रकार गजेंद्र पोळ आदींनी केले. यावेळी प्रा. रामदास झोळ, संतोष वारे, डॉ. रोहन पाटील, वैभव पोळ, दिपक चव्हाण, अमर साळुंके, सुनिल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.