भालेवाडी येथे १६ मे ला मोफत आरोग्य सेवा शिबीर - Saptahik Sandesh

भालेवाडी येथे १६ मे ला मोफत आरोग्य सेवा शिबीर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – भालेवाडी (ता. करमाळा) येथे कै.तानुबाई आदिनाथ शिंदे यांच्या वर्षश्राध्दानिमित्त दि. १६ मे २०२४, गुरुवार रोजी मोफत आरोग्य सेवा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य सेवा शिबिरामध्ये मशिनद्वारे हाडांची तपासणी, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, संधिवात तपासणी आयोजित करण्यात येणार असून, गोळ्या पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत. या आरोग्य सेवा शिबिराचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. वैभव भाऊसाहेब शिंदे यांनी केले आहे.


या शिबिरास तज्ञ डॉ. रोहित दादासाहेब शिंदे (M.S. Ortho) यांचे विशेष मार्गर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमासाठी करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेणीकशेठ खाटेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर, समर्थ हॉस्पिटलचे डॉ.महेश्चंद्र वीर उपस्थित राहणार आहेत. हे शिबिर भालेवाडीतील सार्वजनिक सभामंडपात होणार असून भालेवाडी व परिसरातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!