प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने मागेल त्या गावात टँकर देण्याची व्यवस्था - Saptahik Sandesh

प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने मागेल त्या गावात टँकर देण्याची व्यवस्था


केम (संजय जाधव) – प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून मागेल त्या गावात टँकर देण्याची व्यवस्था सुरू केली असल्याची माहिती प्रा.रामदास झोळ यांनी राजुरी येथे दिली. काल(दि.११) राजुरी येथे भीषण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन येथील यात्रा महोत्सव निमित्ताने झोळ फौंडेशनच्या वतीने टँकर देण्यात आला.

यावेळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ, राजुरी गावचे सरपंच राजाभाऊ भोसले, उपसरपंच सचिन शिंदे,एकनाथ शिंदे, आबासाहेब टापरे ,गणेश जाधव,श्रीकांत साखरे,शरद मोरे,भाऊसाहेब जाधव,व राजुरी गावचे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा झोळ यांनी सांगितले की,आमच्या फाऊंडेशन च्या वतीने मागेल त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची व टँकर ची गरज आहे त्यांनी प्रा रामदास झोळ फाउंडेशन कार्यालयाच्या (९४०५३१४२९६)या नंबर संपर्क साधावा. लागलीच त्या गावाला टँकर देण्यात येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता तालुक्यात एकूण ११८ खेडी व वाडी वस्ती असून काही ठिकाणी प्रशासनाच्या वतीने फक्त ४३ टँकर मंजूर असून ४५ गावांना पाणी पुरवठा होत आहे अशी माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने दिली आहे. प्रा.रामदास झोळ फाउंडेशन च्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून उरलेल्या गावांना मागेल त्या गावात टँकर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ,तसे मागणीचे प्रस्ताव फाउंडेशन च्या कडे जमा करावेत असे प्रा.रामदास झोळ यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!