आरोग्य शिबिरात २३०० रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप - ५० तज्ञ डॉक्टरांनी केली ४७५० रुग्णांची तपासणी.. - Saptahik Sandesh

आरोग्य शिबिरात २३०० रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप – ५० तज्ञ डॉक्टरांनी केली ४७५० रुग्णांची तपासणी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळ्यात घेण्यात आलेल्या तीन दिवसीय महा आरोग्य शिबिरात ४७५० रुग्णांची तपासणी करण्यात येऊन 2300 रुग्णांना मोफत चष्म्याची वाटप करण्यात आले.

या शिबिराच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे आमदार कल्याण शेट्टी यांचे बंधू नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी माजी नगरसेवक एडवोकेट कमलाकर वीर विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे आदी जण उपस्थित होते.

या शिबिरात सुविधा हॉस्पिटल बार्शी गरुड हॉस्पिटल अहमदनगर नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी, डोळे हॉस्पिटल नारायणगाव, उपजिल्हा रुग्णालय करमाळा ,साईदीप हॉस्पिटल अहमदनगर,आनंद ऋषी हॉस्पिटल अहमदनगर,मानसी हॉस्पिटल खंडाळा, बुद्रायणी हॉस्पिटल पुणे, तालुका वैद्यकीय अधिकारी टीम करमाळा,पंढरपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर शितल शहा या हॉस्पिटलच्या नामांकित तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली

375 रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली असून ज्यांना हृदयरोगासंदर्भात अडचणी निष्पन्न झाल्या अशा रुग्णांना मोफत उपचार करण्याची नियोजन आनंद ऋषी हॉस्पिटल अहमदनगर व गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल ठाणे येथे उपचार करण्यात येणार आहेत.

हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख दीपक पाटणे सह कक्ष प्रमुख शिवकुमार चिवटे सहाय्यक रोहित वायबसे वैद्यकीय सहाय्यक नागेश शेंडगे प्रदीप बनसोडे संजय जगताप निलेश चव्हाण केशव साळुंखे राजेंद्र मिरगळ आजिनाथ इरकर जयवंतराव युवा मंच अध्यक्ष जयराज चिवटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख देवानंद बागल युवा सेना जिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे तालुका प्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड महिला आघाडी प्रमुख प्रियंका गायकवाड उपशहर प्रमुख नागेश काळे राजेंद्र काळे उप तालुकाप्रमुख सतीश रुपनर प्रशांत नेटके आदींनी परिश्रम


शून्य ते पंधरा या वयोगटातील लहान मुलांची आरोग्याची तपासणी वेळेचे वेळी करणे गरजेचे आहे सध्या धकाधकीच्या जीवनात सुद्धा ब्लड प्रेशर डायबिटीस डोळ्याचे आजार मान दुखी हृदयविकार असे आजार निष्पन्न होत आहेत यामुळे लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिवसेनेने घेतलेले हे लहान मुलांसाठीचे आरोग्य शिबीर कौतुकास्पद आहे.

– डॉ शितल शहा (प्रसिद्ध बालरोगतज्ञ पंढरपूर)

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एकही रुग्णू उपचार अभावी राहिला नाही पाहिजे हा आदेश आधी सर्व शिवसैनिकांना दिला आहे
त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत व जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी आरोग्य शिबीर घेण्यात येणार असून आरोग्याच्या समस्या सोडण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.

– महेश चिवटे (जिल्हाप्रमुख शिवसेना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!