करमाळा वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.एन.डी.रोकडे यांचे निधन.. - Saptahik Sandesh

करमाळा वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.एन.डी.रोकडे यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा येथील वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.एन.डी.रोकडे (बाबा) (वय ७३) यांचे अल्प आजाराने आज (ता.१०) सायंकाळी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने करमाळा वकील संघात दुःखाची छाया पसरली आहे.

ॲड.रोकडे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे, न्यायाधीश राहुल रोकडे व आदर्श शेतकरी रवींद्र रोकडे यांचे ते वडील होते. करमाळा न्यायालयात ते 1974 पासून वकिली व्यवसाय करत होते, त्यांच्या वकिली व्यवसायाला ४९ वर्षे पूर्ण झाली होती. त्यांनी करमाळा, बार्शी, सोलापूर तसेच पुणे अशा विविध न्यायालयात ॲड.रोकडे यांनी कामकाज पाहिले आहे, त्यांना ‘आदर्श ॲडव्होकेट’ म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने करमाळा शहर व तालुक्यातील अनेकांनी दु:ख व्यक्त केले. उद्या (ता.११) सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळ गावी वांगी नं ३ (ता.करमाळा) येथे त्यांच्या शेतात अत्यंसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!